शालेय शिक्षणाबरोबरच संविधान शिक्षण कौतुकास्पद!अंजली ताई आंबेडकर

संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षा समनतेचा अधिकार दिला!
शालेय शिक्षणाबरोबरच संविधान शिक्षण कौतुकास्पद!अंजली ताई आंबेडकर

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन सह संविधानाचे धडे- सिने अभिनेत्री अलकाताई कुबल

कुंभारी – संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य, अभ्यास, व्यवसाय,, शिक्षण, खेळ, स्वतःचे रक्षण राजकारण आदी सर्व सामान्य माणसाला बहाल केले,याच माध्यमातून समानतेचा अधिकार अनुभव हे संविधानाने बहाल केले, देशाच्या विविधता मार्ग घालून दिला, ज्या संविधानाच्या मुल्यावर देश चालविला जातो,हेच शिक्षण शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा या मागणीसाठी माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाही, परंतु त्यांच्या शैक्षणिक संस्था मार्फत शालेय स्तरावर संविधान विषयांचे अध्ययन केले हे खर्या अर्थाने आज गरजेचे आहे,व ते कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रसिद्ध शिक्षण तज्ञ अंजली ताई आंबेडकर यांनी केले,

त्या जय बजरंग परिवारातील एकूण बारा विद्यालयांमध्ये संविधानाचे शिक्षण हा शिक्षण पूरक उपक्रम घेण्याचा आगळावेगळा उपक्रम गत दोन वर्षापासून सुरू आहे 2022 – 23 या वर्षाच्या संविधान विषयाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी बोलत होत्या, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नारायणराव गावंडे हे होते तर प्रमुख अतिथी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई बाळासाहेब आंबेडकर , जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता ताई आढाऊ, विशेष अतिथी म्हणून माहेरची साडी फेम सीने अभिनेत्री अलका ताई कुबल, संस्थेचे संस्थापक माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, माजी जि प सभापती प्रतिभाताई अवचार चित्रपट निर्माता राधाताई बिडकर. सरपंच कुंभारी ऋषीकन्या अतकरे मनोहर पांडव, श्रीकृष्ण बिडकर, बाळासाहेब अतकरे, प्राचार्य विलास इंगळे, पंस सदस्य विजय बाभुळकर, उपसरपंच राजकुमार क्षीरसागर,आदी सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते , प्रसंगी शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रारंभ झाला, प्रसंगी अलका कुबल यांनी आपले विचार व्यक्त केले दरम्यान प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर यांनी केले संचालन प्रा श्रीराम पालकर यांनी केले

या यशस्वी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण बोदडे, पल्लवी लाउडकार,नेहा सावदेकर जय बजरंग विद्यालय वसाडी,
पुजा घुगे, श्रृती घुगे,पुनम घुगे,जय बजरंग विद्यालय सुकांडा, प्रिया खंडारे प्रेरणा शेलार,गौरी रामचवरे,जय बजरंग विद्यालय रुस्माबाद, आदिती वानखडे, सृष्टी तायडे, धनश्री धानोरकर, अनुश्री वाडेकर जगदंबा विद्यालय डोंगरगाव, प्रणाली वानखडे, मोहिनी खिल्हारे,अप्रिता वानखडे,समुध्दी पडघामोल हनुमंत विद्यालय शिवनी, जान्हवी खंडारे,पायल डवंगे, निकिता जाधव भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा, समिक्षा तायडे,भाविका बिडकर, वैष्णवी जाधव, समिक्षा खरताडे,स्नेहा पोधे,जय बजरंग विद्यालय कुंभारी,प्राचि तायडे,साक्षी आगळे, सानिका अतकरे,जय बजरंग उच्च माध्यमिक विद्यालय कुंभारी,कोमल राऊत,स्नेहल अढाऊ, जान्हवी माहोलकार जय बजरंग विद्यालय चान्नी आदी संविधान शिक्षण परिक्षा उत्तीर्ण यशस्वी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला, कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक प्रकाश बिडकर, रमेश आढाव दिनकर धामणकर पंकज फाले, सुमेध तायडे, डॉ के. व्ही मेहरे, प्रा दिलीप अत्तुरकर प्रा अशोक रहाटे प्रफुल्ल देशमुख प्रा तू अपर्णा खूमकर प्रा शारदा उमाळे प्रा शारदा बावणेर, प्रा अनिता खंडारे, मीना आमले, आशा ताडे, संध्या ताडे, अविनाश ढोरे, शरद मैद, धनंजय पुसेगावकर, बजरंग गावंडे मंजुषा सपकाळ आदींसह जय बजरंग विद्यालय कुंभारी येथील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news