सुकळी ते पिंपळखुठा रस्त्याची दुर्गती 

जेमतेम नवीन बनवण्यास काही दिवस उलटले की नाही तर डागडुगीचा डबल फेर 

 

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा–  पातुर तालुक्यातील पिंपळखुटा ते सुकळी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते परंतु नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याचे वेळ आल्यासारखीच या रस्त्याची दुर्गती झाली आहे ठेकेदारावर अशी कुठली वेळ आली की रस्ता बनवला आणि डबल फेर डांबरीकरण करण्यात आला आहे कोटी रुपयांची शासनाची दिशाभूल झाली आहे असे या रस्त्यातून दिसून येत आहे याला दोषी कोण ?

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी की रोड टेंडर भरणारा ठेकेदार न पाहता कुठल्याही प्रकारे रोडची देखरेख न करता कागदोपत्री रोडला मान्यता दिली जाते का असा प्रश्न उद्भवत आहे याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे

डांबरीकरण करताच अगदी दोन महिन्यात सदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दाखल केले कंत्राटदारांनी सदर खड्ड्यात चुरी डांबर टाकून रस्त्यावर खड्डे पडल्याने डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसत आहे त्यामुळे रस्त्याची चौकशी करण्याचे ग्रामस्थांचे अग्रणी मागणी आहे

जहूर खान सरपंच खेट्री ग्रामपंचायत 

अगदी काही महिन्यापूर्वीच केलेल्या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे सदर निकृष्ट रस्त्याबाबत ग्रामसभा मध्ये ठराव पारित केला आहे व वरिष्ठाकडे सादर सुद्धा करण्यात आलेला आहे सदर प्रकरणाची मंत्रालयात सुद्धा तक्रार करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news