नाल्याच्या सांडपाण्याने नागरिक त्रस्त
सांडपाणी समस्याने अनेक नगरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
शिर्ला ग्रामपंचायत हि ग्रामपंचायत पातुर तालुक्यातील सर्वात मोठीं आहे. पातूर शहरातील अनेक भाग शिर्ला ग्रामपंचायत हद्दीमध्ये येतो शिर्ला ग्रामप समस्यांची रेघ लागलेली आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत बँक खात्यामध्ये उलाढाल असताना सुद्धा सार्वजनिक सांडपाण्याच्या नाल्याचे अजून पर्यंत कुठलाही प्रकारे विकास झालेला नाही त्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत व ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता मागणी केली आहे या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे डासांमुळे होणारे आजार तसेच अकोला जिल्हात आढळून आलेला जेएन 1 कोविड सारख्या आजारांना सामोरे जावे लागेल
आतापर्यंत नाल्याच्या सांडपाण्याची विल्हेवाटाची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरा भवती घाण पाणी साचल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे तसेच साथीचे आजार पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी ग्रामपंचायतीने दक्षता घेऊन सदर समस्या जातीने सोडवण्यात यावी याकरिता ग्रामस्थ ठाम आहेत यावेळी सदर प्रकारचे निवेदन गटविकास अधिकारी पातुर तहसीलदार पातुर तथा सन्माननीय आमदार यांना सुद्धा देण्यात आले आहे
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा