अकोल्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वणी रंभापूर बसथांबा नजीक समोरच्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोनजण जखमी झाले आहेत. अपघातात कारच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कारच्या एअर बॅग
उघडल्याने मोठी हानी टळली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली