मनपा व्दारे शास्त्री नगर येथील ओपन स्पेस मधील अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई.
अकोला दि. 29 डिसेंबर 2023 – अकोला महानगरपालिका पुर्व क्षेत्रांतर्गत शास्त्री नगर, आकशवाणी मागे मौजे उमरखेड सर्व्हे नं. 13/1 मधील खुल्या जागेवर (ओपन स्पेस) मध्ये शेख शामद शेख मोहम्मद धारक खलीकुनबी ज.शे.शामद यांनी 50 चौ.मि. पक्कया स्वरूपाचे आणि 120 चौ.मि.टीनशेडचे असे एकुण 170 चौ.मि. चे अतिक्रमण केले होते.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये सदरचे अतिक्रमीत बांधकामावर पुर्व झोन कार्यालय आणि अतिक्रमण विभागाव्दारे निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सहा.नगर रचनाकार राजेंद्र टापरे, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, यांचेसह अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि अभिकर्ताचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
💥सत्य लढा इफेक्ट 👊 अखेर मनपाच्या नाकावर टिचून करण्यात आलेले अतिक्रमण केले कायमस्वरूपी दूर!