शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील रुग्णांचे जेवणची व्यवस्था श्री संत गजानन महाराज शेगांव या संस्थानला द्या – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेश काळे यांची मागणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये आढळल्या जिवंत अळ्या
अकोला – शासकीय वैद्यकीय रूग्णालय अकोला दवाखाण्यात रुग्ण उकर्जा बळीराम मेहरे, रा. उगवा हे वार्ड क्र 31 मध्ये उपचारार्थ भरती आहे. दिनांक 29/12/2023 रोजी दुपारी 12 वाजता जेवन घ्यायला गेले असता सदर आहार मध्ये अळ्या व किडे दिसून आले. त्या जेवनाचे छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध आहे. सदर रुग्णाने आहाराविषयी तक्रार केली असता तेथील कर्मचा-यांनी ते जेवन फेकून दिले व रुग्णास दमदाटी करून हाकलून दिले. त्यानंतर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षाकडे तक्रार करून सदर घटनेची माहिती दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून हलगर्जीपणा करणारे कर्मचा-यावर निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन या विषयावर छेडण्यात येईल. शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला येथे रूग्णांच्या जेवण्याची व्यवस्था गजानन महाराज संस्थान शेगांव यांच्या कडे देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रशंसा मनोज अंबेरे, विधी व न्याय जिल्हाध्यक्ष नाना बोरकर, शेखर पोटदुखे, प्रेम पाटील मगर, शब्बीरभाई मॅकॅनीक, पवन राऊतकर, रवि मानकर, सुभाष अंधारे, विभाग अध्यक्ष संजय दुधे आदी मनसे सैनिकानी एका निवेदनाद्वारे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना केली आहे.