बोरगाव मंजूत जनावरे चोरणारी टोळी सक्रिय
बोरगाव मंजूच्या एका चोरट्यावर गुन्हा दाखल इतर चोरटे मात्र मोकाट
रोज चोरट्यांचा सपाटा सुरूच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
बोरगाव मंजू :स्थानिक बोरगाव मंजू सह परिसरातील गावांमध्ये चोरट्यांनी चांगलाच धूमाकुळ घातला असून रोज कुठे ना कुठे निशाना साधुन हात साफ करित असुन जनतेच्या हजारो रुपयांचा माल लंपास करीत आहेत यामध्ये जनावरे चोरी चे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पशुपालकांचया घरासमोर बांधलेली जनावरे मोठ्या वाहनात टाकून चोरून नेली जात आहेत रोज जनावरे चोरी जात असल्याने पशू पालकांचे मोठे नुकसान होत आहे बोरगाव मंजू येथे जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून चोरट्यांचे नाव सांगितले तरी पोलीस चोरट्यावर कार्यवाही करण्याची हिंमत करीत नाही या पशुपालकामधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे असाच एक चोरीचा प्रकार घडला दि. 7 डिसेंबरचे रात्री दरम्यान बोरगाव मंजू माळीपुरा येथील नंदकिशोर इंगळे यांचा20हजार रूपये किंमतीचा बैल नेहमी प्रमाणे घरासमोर बांधलेला होता परंतु येथीलच जुबेर खान उर्फ गोलु याच्या सोबत तिन चार चोरटयाने बैल आपल्या साथीदारांच्या मदतीने वाहनात टाकून चोरुन नेला पोलीसांनी मात्र म्हणावी तशी अजून पर्यंत पूर्ण चोरटयावर कार्यवाही केली नाही त्यामुळे आता हे पशुपालक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेकडे धाव घेण्याच्या तयारीत आहेत