ग्रामपंचायत सरपंच सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण अकोला येथे संपन्न

ग्रामपंचायत सरपंच सदस्याचे क्षमता बांधणी प्रशिक्षण अकोला येथे संपन्न

अभिसरणाच्या माध्यमातुन शास्वत विकास साधावा- सत्र समन्वयक सुधीर सरकटे

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत अकोला तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांचे प्रशिक्षण यशदा पुणे जिल्हा परिषद अकोला व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. विश्राम गृह अकोला येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्या शितल मेटकर, निर्देशक नागसेन बागडे, गटविकास अधिकारी तापी साहेब, बारगिरे साहेब, विस्तार अधिकारी सतिश सरोदे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली सत्र समन्वयक सुधीर सरकटे यशदा प्रशिक्षक रोहिदास भोयर, गणेश पोटे, विशाल बकाल यांनी गावाचा पर्यायाने ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळतांना उपयुक्त ठरणारी माहिती क्षमता बांधणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येत असताना कार्यात गतिमानता येण्याकरिता सरपंच उपसरपंच सदस्यांचे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय तसेच वैयक्तिक स्तरावरील योगदान असण्याकरिता दि.२८/१२/२०२३ ते ३०/१२/२०२३ ला जिल्हा परिषद विश्राम गृह अकोला येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या उद्धाटना करीता निंभोरा सरपंच नितीन ताथोड, वरूडी सरपंच उषा खंडारे,रामगाव सरपंच शोभा गावंडे,अमानतपुर सरपंच सुमित्रा कात्रे, सुधीर सरकटे, इतर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, उपसरपंच उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये ग्रामपंचायत चे कामकाज मासिक सभा, ग्रामसभा महिला सभा व सभेच्या वेळेचे व्यवस्थापन, शास्वत विकासाचे उद्वीष्टे, सरपंच सदस्य पदाचे अधिकार ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 व सामाजिक लेखापरीक्षण व्यक्तिमत्व विकास, लोकसहभागातून ग्रामविकास, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ठळक तरतुदी, सरपंच उपसरपंच सदस्य पदाचे अधिकार कर्तव्य व जबाबदारी, जलसाक्षरता, पाण्याचे ताळेबंद, घनकचरा व्यवस्थापन, नेतृत्व गुण, गाव विकासाची दृष्टी, आमचा गाव आमचा विकास, 15 वित्त आयोग, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, गाव विकास विविध समित्या, खरेदी प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे बाबी, अंदाज पत्रक, 1 ते 33 नमुने, मानव विकास निर्देशांक, आदर्श गाव संकल्पना चित्रफित दाखवून यावर चर्चा करण्यात आली असून इत्यादी विषयाची सविस्तर अशी माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली या प्रशिक्षणा मध्ये अंबिकापुर, भोड, वरूडी, निंभोरा, अमानतपुर, टाकळी जलम, खडकी टाकळी, कासली बु, वडद बु, रामगाव, कौलखेड गोमासे, कट्यार, टाकइत्यादी ग्रामपंचायत सदस्य या प्रशिक्षणाला उपस्थित होते या प्रशिक्षणाचा समारोप दिनांक ३० डिसेंबर २०२३रोजी करण्यात आला असून प्रशिक्षणार्थींना उपयुक्त असलेली माहिती पुस्तिका व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला संचालन सुधीर सरकटे यांनी केले असून आभार गणेश पोटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news