एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय पातुर संमंधीत सेवा भरतीत गोळबंगाल
आलेगाव येथील अंगणवाडी सेविका मदतनीस भरती करिता अर्ज देणाऱ्या महिलेची तक्रार
पातूर तालुका व शहरातील अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया सुरू आहे तर शासकीय निकषानुसार ग्रामपंचायत, नगर परिषद, या सार्वजिक कार्यालया अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतीस भरती प्रक्रिया घेण्यात आल्या शासकीय निकषानुसार स्थानिक पातळीवर असलेल्या गुणवत्तेनुसार महिलांची निवड करण्यात येते परंतु आलेगाव येथील अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ? या भरती प्रक्रियेमध्ये. शासकीय निकषांच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे या यादी मध्ये फेरबदल करण्यात आले असल्याची चर्चा उमेदवार महिलांमध्ये होत आहे त ही फेरबदल काही देवाण-घेवाण करून झाल्याची दबक्या आवाजात चर्चा होताना दिसत आहे शासकीय निकषानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाकरिता अकोला जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत भरती प्रक्रिया करिता अर्ज मागविण्यात आले होते त्याच अनुषंगाने पातुर तालुक्यातील आलेगाव ही ग्रामपंचायत करिता उमेदवारांनी अर्ज भरले होते यामध्ये शासकीय निकष उमेदवारांच्या शिक्षण प्रणालीवर , तसेच नियमानुसार गुणवत्ता जर सारखी येत असेल तर वयानुसार , अशा काही अटी या भरती करिता ठरवण्यात येतात परंतु या मध्ये खूप गोडबंगाल झाल्याचे दिसून येत आहे याकडे शिक्षण विभागाचा पोकळ कारभार असल्याचे समजते तर पातुर पंचायत समिती मंध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका काय तर या गोडबंगाल झालेल्या प्रकरणात राजकीय पाठबळ असलेल्या उमेदवारांची वर्णी लागेल याची चित्र दिसत आहे मग काय कारवाई होईल याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष वेधले आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा