तेरा दिवसानंतर पिंजर येथील शेखअफ्फान चा मृतदेह आढळला विहिरीत!
घातपात झाल्याची शक्यता! पिंजर पोलिसांपुढे मोठे आव्हान!
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंजर येथील शेख अफ्फान शेख अयूब बागबान वय वर्ष सात हा गेल्या 19 डिसेंबर पासून घरासमोरून खेळत असताना बेपत्ता झाला होता. याविषयी
शेख अफ्फान याच्या वडिलांनी शेख अफ्फान हरवल्याची पिंजर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. पोलीस प्रशासनाने तसेच त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.शेख अफ्फान त्याच्या वडिलांनी शेखअफ्फान आणून देणाऱ्यास किंवा त्याचा शोध घेणाऱ्या दीड लाखाचे बक्षीस सुद्धा ठेवले होते. मात्र शेख अफ्फान याचा शोध लागला नाही. आज दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास डॉग स्कॉड मदतीने शोध घेतला असता शेख अफ्फान अरुण लहाने यांच्या शेतात मधील विहिरीमध्ये शेख अफ्फान याचा मृतदेह आढळला सदर मृतदेह संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक चे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर मृतदेह बाहेर काढला असून सदर मृतदेह
पोस्टमार्टम करिता रवाना केला असून शेख अफ्फान शेख अयूब बागबान वय वर्ष सात नेमकं काय झाले नेमका मृत्यू कशाने झाला याचा तपास पिंजर पोलीस स्टेशन करीत आहे.