गस्त घालणाऱ्या पोलिसांवर गोळीबार!

गस्त घालणाऱ्या पोलिसांवर गोळीबार!

बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना!

बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या परिसरातून गोवश तस्करी तसेच पेट्रोलचा डेपो असल्या कारणामुळे पोट्रोल चोरी होत असल्याने पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते. ठाणेदार गोपाल ढोले यांनी उरळ पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसला आहे. उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी दिलेल्या माहितीवरून रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग वाढवण्यात आला आहे. यामध्ये हातरूण आणि मांजरी भागातही पेट्रालिंग वाढवली आहे. दरम्यान काल रात्री हातरूणचे बीट जमादार दिनकर इंगळे आणि वाहन चालक मुंडे हे चारचाकी पोलीस वाहनात पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर मोटर सायकल स्वार असलेल्या लोकांनी गोळीबार केला.पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेत दुचाकी पोलिसांनी दिसून आली नाही.या प्रकरणी पोलिसांनी कड्क पाऊले उचलली आहेत.लवकरच गोळीबार करणारे अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news