राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभाग महानगर (जिल्हा)अध्यक्षपदी अनिल मालगे यांची नियुक्ती
अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगर जिल्हाध्यक्षपदी अनिल मालगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे जी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे व सरचिटणीस शिवाजीराव गरजे यांच्या आदेशान्वये अकोला महानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी अनिल मालगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख यांच्या शिफारशीवरून नियुक्ती केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी महाराष्ट्र प्रदेश च्या मान्यतेने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष महानगर अध्यक्ष व प्रदेश कार्यकारणीची नुकतीच नवीन कार्यकारणी घोषित केली त्यामध्ये अकोला महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून अनिल मालगे यांना संधी देण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून अनिल मालगे हे कार्यरत असून त्यांनी पक्षामध्ये सेवादल महानगर अध्यक्ष सेवा दल प्रदेश संघटन सचिव तसेच ओबीसी विभाग महानगर अध्यक्ष आदी पदे भूषविलेली आहेत त्यांचे संघटनात्मक बाबी पाहून व पक्ष संघटनेमध्ये असलेली त्यांची पकड पाहून महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख माजी आमदार प्रा. तुकाराम भाऊ बिडकर आमदार अमोल दादा मिटकरी यांच्या मार्गदर्शनात अनिल मालगे यांची नियुक्ती मुंबईवरून घोषित करण्यात आली महानगर अध्यक्ष विजय भाऊ देशमुख यांनी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल अनिल मालगे चे स्वागत केले अनिल मालगे यांचे नियुक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे अशी माहिती गणेश भुजबले यांनी दिली