कुठलेही पेट्रोल पंप बंद राहणार नसून पेट्रोल पंप पूर्णपणे सुरू राहणार!

कुठलेही पेट्रोल पंप बंद राहणार नसून पेट्रोल पंप पूर्णपणे सुरू राहणार!

अफवांमुळे वाहन चालकांची पेट्रोल पंपावर तुफान गर्दी!

अकोला: केंद्र शासनाने मोटर वाहन अधिनियम अंतर्गत तीन कायदे पारित केले त्यामध्ये हिट अँड रन अंतर्गत दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड चे प्रावधान करण्यात आले.या कायद्याविरोधात मोटर वाहन चालकाच्या सर्व संघटनांद्वारे चक्काजाम आंदोलनाचे आवाहन करण्यात आले त्या अंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम सुद्धा करण्यात आले यामध्ये पेट्रोल पंप टैंकर चालक सुद्धा समाविष्ट असल्याचा अफवा पसरविण्यात आल्या त्यामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असा समज नागरिकांनी घेतल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी उसळली कुठलीही पेट्रोल पंप बंद राहणार नसून पेट्रोल पंप पूर्णपणे सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्या दुपारपर्यंत ड्रायव्हर लोकांचा संप राहणार आहे. दुपारनंतर पुन्हा पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. तसेच 31 डिसेंबर 2024 ला पेट्रोलचे भाव कमी होणार होते. त्यामुळे बऱ्याच पेट्रोल मालकांनी पेट्रोलचा माल उचलला नसल्या मुळे बरेच पेट्रोल पंप बंद होते. त्यामुळे बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला होता. आताही पेट्रोल-डेपो येथे टँकर भरण्याचे काम सुरू आहे. कुठलेही पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचे अकोला येथील गांधी चौक येथील मुरारका पेट्रोल पंप संचालक यांनी सत्य लढा सोबत बोलताना सांगितले तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news