अकोला शहरातल्या कृषी नगर मध्ये एकाची हत्या….

अकोला ब्रेकिंग

शहरातील कृषीनगर कॅम्पसमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकणारा व जळगाव जामोद येथील विशाल मधुकर झाटे (20) या विद्यार्थ्याच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत पडलेल्या विशालला स्थानिक नागरिकांनी तत्काळ अकोल्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या कृषी नगर संकुलात मिरज सिनेमासमोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता.त्यानंतर काही दिवसांनी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news