पातूर नागरीतून अयोध्या येथील पूजित अक्षत कलश शोभा यात्रा संपन्न……

(वारकरी संप्रदायिक परंपरेने टाळ मृदंगाच्या गजरात भव्य शोभा यात्रा)
श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील श्री राम मंदिर मध्ये रामलल्ला च्या बाल रुपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येणाऱ्या 22 तारखेला होत असून त्या निमित्ताने संपूर्ण भारत देशामध्ये अयोध्येतील रामाचे अक्षत रुपी निमंत्रण देण्यासाठी चे अक्षत कलशाचे पातूर येथे आगमन झाले त्यावेळी संपूर्ण पातूर नागरीतून वारकरी संप्रदायिक परंपरेने टाळ मृदंगाच्या गजरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा पातूर नगरीचे आराध्य दैवत श्री सीदाजी महाराज मंदिर येथून प्रारंभ होऊन मुख्य रस्त्याने पोलीस स्टेशन चौक, आठवडी बाजार, गुरुवार पेठ चिरा चौक, विठ्ठल मंदिर, गुजरी लाईन, बाळापूर वेस, सीदाजी वेताळ मार्गे पुन्हा श्री सीदाजी महाराज मंदिर येथे पोहचली या पालखी यात्रेत पातूर मधील सर्व टाळकरी महिला मंडळ तसेच पास्तूल व खानापूर येथील टाळकरी मंडळी सुद्धा सहभागी होऊन यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर शोभा यात्रेची सांगता करण्यात आली व अभियानातील सर्व वस्ती प्रमुखांना कलशाचे वितरणात करण्यात आले आता यानंतर हे सर्व वस्ती प्रमुख आपल्या टोळीला घेऊन सदर अक्षत निमंत्रण पत्रिका घेऊन दि 1 ते 15 तारखे पर्यंत प्रत्येकाच्या घरी जाऊन हे रामाचे निमंत्रण देणार आहेत. या संपूर्ण अभियाना मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पातूर, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्री खडकेश्वर मंडळ, श्री तपेहनुमान व्यायाम शाळा, श्री सीदाजी महाराज व्यायाम शाळा, आई भवानी मंडळ गुरुवार पेठ , योगीराज गणेश मंडळ, पिंपलळेश्वर मंडळ, तसेच भारतीय जनता पार्टी पातूर या सर्वांनी एकत्र येऊन सहभाग दर्शविला या अभियानाचे पातूर नगर संयोजक श्री राजू भाऊ हिरळकार, पुष्पराज कढोने, रामेश्वर राणे,धनंजय गाडगे, पंकज बंचर, गजानन वानखडे, महेश बोचरे, आकाश सातव, योगेश परमाळे यांनी या करिता अथक प्रयत्न केले.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा