गोरखधंदा शब्दांवर बंदीकरीता वैदर्भीय नाय समाज संघाचे एक दिवसीय चरणे आंदोलन!
अकोला नाथ सांप्रदायात पवित्र मानल्या जाणान्या गोरखधंदा या शब्दाच्या अनुचित वापरासाठीच्या बंदीसाठी वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नवनाथांपैकी एक गुरु गोरक्षनाथांनी अवघ्या जगाला योगाची अमुल्य देणगी दिली. तसेच सनातन धर्माचे स्थापनेमध्ये सुध्दा आपले अमुल्य योगदान दिले असून भारतातच नाही तर देश विदेशातील असंख्य नागरिकांनी नाव सांप्रदाय तथा नाथपंथाच्या विचारधारेशी समरुप होऊन त्यांनी नाथ सांप्रदायाची दिक्षा सुध्दा घेतली आहे. अतिशय खडतर अशा हठ योगाचे जनक म्हणून सुध्दा गुरु गोरक्षनाथ ओळखले जातात. त्यांनी संपूर्ण देश भ्रमंती करुन योगाचा प्रचार प्रसार केला. नाथ सांप्रदयामध्ये नाथपंथीय योगी आपल्या शरिरावर अनेक रहस्यमय आभुषणे परिधान करतात. त्यातील एक म्हणजे धंदारी यालाच धण्डोड किंवा धंधोरा अशी नावे आहेत, हे एक प्रकारचे चक्र असून ते लाकडाचे किंवा लोखंडाचे बनविलेले असते व त्याला मध्यभागी एक छिद्र असते या छिद्रातून कवडी किंवा धागा मंत्रोच्चारात मालाकार घालतात व बाहेर काढतात. सदर क्रियाही नाथपंथातील सिध्दी प्राप्त झालेला योगीच करु शकतो. गुरु गोरक्षनाथांनी या रहस्यमयी प्रक्रियेची सुरुवात केल्यामुळे या क्रियेला गोरक्षनाथांचा गोरखधंदा म्हणजेच जो कोणी सामान्य व्यक्ती करुच शकत नाही व तसे नाथ सांप्रदायाच्या साहित्यात नमुद सुध्दा आहे.
परंतु आजकाल असे निदर्शनास येत आहे की, पुरेश्या माहिती अभावी व नाथ सांप्रदायाशी संबंधील शब्दांच्या अज्ञानाअभावी महाराष्ट्रातील प्रिंटमिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया व सोशल मिडीया यामध्ये सदर गोरखधंदा हा पवित्र शब्द अनैतिक कृत्ये, चोरीचपाटी व विविध प्रकारच्या घोटाळ्याच्या आणि गैरव्यवहाराच्या बातम्यांमध्ये शिर्षकाकरीता वापरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम नाथपंथीय समाजाच्या भावना दुखावल्या जात असून सदर शब्दाच्या वापरावर तात्काळ स्वरुपाने शासकीय स्तरावर बंदीचा आदेश निर्गमित करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सदर आंदोलनात वैदर्भीय नाथ समाजसंघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी पवार तसेच अकोला जिल्हा समिती अध्यक्ष नागेश एकनाथ जाधव, विनोद चव्हाण, हरिनाथ विधाते, शुभम बाडेकर, नाथ समाजसंघाचे उपस्थित होते.