विहिरीत पडून इसमाचा मृत्यु कानशिवनी शेत शिवारातील घटना
माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक यांच्या माध्यमातून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला
कुरणखेड – योगेश विजयकर – बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कानशिवनी गावातील शेत शिवारामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह शेतातील विहिरीमध्ये पडेल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांच्या माध्यमातून कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक सदस्य यांना पाचरण करण्यात आले घटनास्थळी पोचल्यावर कानशिवनी शेत शिवारातील 50 फूट खोल पडक्या विहिरी मधून आपत्कालीन बचाव पथकाच्या माध्यमातून मृतदेह अथक परिश्रमातून विहिरीच्या बाहेर काढण्यात आला मृतदेह बाहेर काढला असता मृत्युकाची ओळख पटली असून संतोष दयाराम राऊत वय ५० असे नाव समजले मृतक हा आज सकाळपासूनच घराच्या बाहेर निघून गेला असल्याचे कळले आहे हा इसम विहिरीत पाय घसरून पडला असल्याची शंका स्थानिक नागरिकांनी दाखवली आहे यावेळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला यावेळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे कानशिवनी बीट जमादार योगेश काटकर, सोळंके, यांच्या मार्गदर्शनाखाली कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक प्रमुख रंजीत घोगरे संपर्क प्रमुख योगेश विजयकर,विरेंद्र देशमुख, विजय माल्टे, शाहबाज शाहा, राम उमाळे,शेख नजिर, ईश्वर हरणे, शुभम कातखेडे, यांनी ५० फूट खोल पडक्या विहिरीतून अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला यावेळी घटनास्थळी पंचायत समितीचे माजी सभापती राजेश वावकार, सामाजिक कार्यकर्ते दिपक अढाऊ, व गावकरी उपस्थित होते.