अकोला जिल्हा व शहर पेट्रोल डिझेल टॅंकर असोसिएशचा तात्पुरता संप मागे
टँकर ड्रायव्हर असोसिएशची माहिती
नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात ड्रायव्हर युनियनने केलेला संप तात्पुरता मागे घेण्यात आला असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक आज सायंकाळी सात वाजता पासून सुरू करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधकारी कार्यालय समोर मोटर मालक असोसिएशन चे अध्यक्ष जावेद पठाण यांनी आपल्या प्रतिक्रिया द्वारे दिली आहे.यावेळी टँकर मालक चालक असोसिएशन चे अध्यक्ष अहमद खान, मोहम्मद मोबीन, अयुब खान मुमताज खान, फैयाजोदि, वसीम खान, अमीन खान, रिजवान खान,अमीन पटेल.उपस्थित होते