भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेन्न तपासणी व मोफत मोतीबिन्दु शस्त्रक्रिया शिबीर संपन्न!

भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद चे माजी शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा वाढदिवस दोन जानेवारी रोजी संपन्न झाला वाढदिवसाच्या निमित्त साधून चंद्रशेखर पांडे गुरुजी हे सदैव बहुजन समाजासाठी तत्पर असतात. गोरगरिबांचे नेते म्हणून ओळख असणारे एकमेव नेते म्हणजे चंद्रशेखर पांडे गुरुजी. गेल्या पंधरा वर्षापासून उपक्रम राबवत आहेत सामान्य नागरिकांना समाजसेवा देणारे चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. संत गजानन महाराज मंदिर, कैलास नगर, लोकमत प्रेसच्या समोर (MIDC), कुंभारी येथे वाढदिवसाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई व दम्माणी हॉस्पिटल अकोला, व तसेच श्री पांडे गुरुजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेन्न तपासणी व मोफत मोतीबिन्दु शस्त्रक्रिया शिबीर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिबिरामध्ये तीनशेच्या वर लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता दीडशे नागरिकांचे नोंद करण्यात आली. त्यासोबतच चष्म्याचे वाटप सुद्धा यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री रणधीरजी सावरकर आमदार, सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री किशोर मांगटे पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला. तसेच माजी महापौर विजय अग्रवाल. जयवंत भाऊ मसने हे उपस्थित होते. या शिबिरामध्ये तपासणी केलेल्या सर्व मोतीबिंदुच्या रुग्णांची लेन्स टाकून बिनटाक्याच्या पद्धतीने शस्त्रक्रिया दम्माणी नेत्र रुग्णालय,अकोला येथे मोफतकरण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. या शिबिराकरिता विशेष सहकार्य : मा. श्री. सभापती शुक्लजी (डायरेक्टर दम्माणी नेत्र हॉस्पीटल) डॉ. मनिपजी हरसे (मुख्य शल्य चिकीत्सक), डॉ. दत्ता पवार, डॉ. दीपिका तेलगोटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.