“सत्यशोधक” चित्रपटाचा प्रिमियर शो उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांचे उपस्थित संपन्न
उपमुख्यमंत्री ना अजित दादांनी पाहिला “सत्यशोधक” चित्रपट.
मुंबई येथे आयनॉक्स थिएटर मध्ये निलेश जळमकर दिग्दर्शित “सत्यशोधक या चित्रपटाचा प्रीमियर शो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. श्री. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी आमदार अमोल दादा मिटकरी, आमदार श्री एकडे, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, चित्रपटाचे कलावंत संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे व इतर कलावंत तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष श्री थुल, दिग्दर्शक राजू मेश्राम. चित्रपट निर्मात्या सौ राधा बिडकर, निवृत्त सहाय्यक पोलीस कमिशनर श्री अशोक गोरे, माजी उपसभापती गजानन म्हैसणे, अनिल मालगे उपस्थित होते. चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, श्री बोराटे, श्री शेळके तसेच चित्रपटाचे ईतर तंत्रज्ञानी यावेळेस हजेरी लावली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाच्या पूर्व संध्येला आयोजित या शो ला चित्रपटसृष्टीतील गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. चित्रपट अतिशय उत्कृष्ट झाला असून निर्माता व दिग्दर्शकाचे दादांनी अभिनंदन केले. चित्रपटा मधील कलावंतांनी केलेल्या भूमिकेचे अजित दादांनी कौतुक करून सर्वांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन केले.