आजच्या स्त्री संरक्षण कायद्याच्या मुळाशी सवित्रीआईच-श्रीराम पालकर
जय बजरंग कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीआई फुले जयंती साजरी
कुंभारी :- भारतीय स्त्रीयांना दास्यत्वाच्या गुलामगीरीतून मुक्त करण्याकरीता तत्कालीन निरक्षरता,प्रथा, रूढी, परपंरा, यामध्ये सुधारणा करुण स्त्रीयांचा सामाजिक, शैक्षणिक दर्जा उंचावल्या शिवाय राष्ट्रीय प्रगती अशक्य आहे, असे प्रतिपादन प्रा श्रीराम पालकर यांनी केले.
स्थानिक जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय कुंभारी येथे सावित्रीआई फुले यांचा जयंतीदिन प्रा श्रीराम पालकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.या निमित्ताने संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे प्रथम साक्षी जगताप,द्वितीय दिव्या खडके,तृतीय स्वप्निल मोहळे यांनी पटकाविले.यावेळी विचारपीठावर प्रा अशोक राहाटे, प्रा दिलीप अप्तुरकर,प्रा अशोक भराड, प्रा प्रफुल्ल देशमुख, प्रा अनिता खंडारे, प्रा शारदा बावनेर,प्रा शारदा उमाळे, प्रा मंजुषा सपकाळ,कार्यकमाचे प्रास्ताविक प्रा अशोक भराड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री रविन्द्र कल्याणकर, नारायण धनागरे,विजय शिंगाडे आदींसह वर्ग प्रमुखांनी परिश्रम घेतले.कार्यकमाचे उत्कृष्ट संचालन कु श्रृती आंबुसकर व कु साक्षी पायघन यांनी केले,तर प्रा शारदा उमाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.