दुचाकीच्या अपघातात दोन जखमी ; एक गंभीर

दुचाकीच्या अपघातात दोन जखमी ; एक गंभीर

पातूर-बाळापूर रोडवरील आयुर्वेदिक महाविद्यालया समोरील उड्डाणपुलाखालील घटना

पातूर : पातूर ते बाळापूर रोडस्थित असलेल्या आयुर्वेद महाविद्यालयाजवळ एका दुचाकीला अपघात झाल्याने एक दुचाकीस्वार गंभीर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. पातूर पासून बाळापूरकडे जाताना सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आयुर्वेद महाविद्यालयाजवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली आज दि.2/01/2024 रोजी रात्री सुमारे 7:45 वाजताच्या दरम्यान दोन व्यक्ती आपल्या दुचाकी क्रमांक एम. एच. 30 ओ 7132 ने पातूरकडून बाळापूर कडे जात असतांना विरुद्ध दिशेने येत वाहनाचे प्रखर लाईट डोळ्यावर पडल्याने दुचाकीस्वाराचे संतुलन बिघडले व सदर दुचाकी भरधाव वेगात दुभाजकावर जाऊन आदळली.यामध्ये दुचाकी चालक प्रमोद हिंमत लांडकर (वय ४५) रा.आगीखेड हे गंभीर जखमी झाले असून मागे बसलेले गजानन चंद्रभान कोल्हे हे देखील जबर मार लागून जखमी आहेत.सदर घटनेची माहिती मिळताच दूले खान युसुफ खान, असिफ अली, समीर अली, शेख मोहसीन व आदी यांनी घटनास्थळी जाऊन पातूर पोलिसांना माहिती दिली व पातूर पोलिसांच्या मदतीने जखमीस प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे आणून प्रथमोपचार करण्यात आले असता प्रमोद लांडकर हे गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले आहे. दरम्यान पातूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत.

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news