पुन्हा वंचितच्या महिला आघाडीने महिला अत्याचार रोखला व पिडीत महिलेला न्याय मिळवून दिला..

पुन्हा वंचितच्या महिला आघाडीने महिला अत्याचार रोखला व पिडीत महिलेला न्याय मिळवून दिला..
पोलिस प्रशासनाला जाब विचारून विनयभंगासह विविध गुन्हे दाखल करून घेतले.

अकोला जिल्हयातील महिलांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे किंवा कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी वगळता हि सतत महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये त्या पिडीत महिलेला न्याय देण्यासाठी धावुन येत राहते. अकोला शहरातील डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीत अशीच पुन्हा एक महीला अत्याचाराची घटना घडली असून. सदर पिडीतेला वाईट दृष्टीने व लगट साधण्याचा प्रयत्न आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून करत होता पण सदर पिडीता विरोध करत असल्याने त्या पीडितेला भर रस्त्यात ऑटोतुन ओढून मारहाण केली.

सदर प्रकरणाची पोलिस तक्रार देण्यासाठी पिडीता का गेली म्हणून तीच्या घरी जाऊन तीला अमानुष मारहाण केली. पोलिस प्रशासनाने या गंभीर प्रकरणात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे पिडित महीलेला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला व त्या महिलेला न्याय दिला तसेच एफ. आय. आर नोंदवून वाढीव विनयभंगाची कलम दाखल केली. परंतु त्याला अटक होईपर्यंत वंचित बहुजन महिला आघाडी गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी प्रदेश महासचिव मा. अरूंधतीताई शिरसाट यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट,महानगराध्यक्ष वंदनाताई वासनिक, जि. प. अध्यक्ष संगीताताई आढावू, शिक्षण व आरोग्य सभापती मायाताई नाईक, माजी समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, विकास सदांशिव, महिला महानगर महासचिव ज्योती खिल्लारे, पश्चिम युवा महानगराध्यक्ष आशिष मांगुळकर, विद्या अंभोरे, व्दारकाबाई शिरसाट यांच्यासह जिल्हा व महानगर महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news