सामुहिक आत्मदहन करणार असणाऱ्यांना सिटी कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात.!
अपंग अनुशेष मधून नियुक्ती मिळणविलेल्या बोगस अपंग शिक्षकांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपंगाचे सामुहिक आत्मदहन करणार असणाऱ्यांना सिटी कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात.बोगस अपंगांवर आळा बसावा म्हणून अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या कायद्यानुसार २१ प्रकारच्या अपंगांना तपासणी करून ऑनलाईन पर यु.डी.आय.डी अपंग प्रमाणपत्र काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु काही बोगस अपंगांनी जुने अपंग प्रमाणपत्र डॉक्टरांसोबत आर्थीक व्यवहार करून अपंग नसतांनी सुध्दा अपंग प्रमाणपत्र बनविले व त्या मधून नोकन्या मिळविल्या असे निदर्शनास आलले आहे. अशा अपंगांचा शोध घेण्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात बोगस अपंग पकडो अभियान मागील एक वर्षापासून चालविण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत अपंग अनुशेष मधून नियुक्ती मिळविलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय/निलंबनाची कार्यवाही या सारख्या संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात आलेल्या आहे तरी अकोला जिल्ह्यातील आकोट नगर परिषदमधील बोगस अपंग शिक्षण तृष्णा तिवारी. अनिल कुरइ. पुनम काळपांडे. व भुषन नाथे यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी. व आर्थीक संगनमत करुन कार्यावाही करण्यास दुर्लक्ष करणारे प्रशासन अधिकारी सुनिल तरोडे यांच्यावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यचे राज्य महासचिव श्री. राजिक शाह यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपंगाचे सामुहिक आत्मदहन आंदोनल करण्यात इशारा देण्यात आला होता. आत्मदहन करण्यापूर्वीच सिटी कोतवाली पोलिसांनी प्रसंगावर मात करी आत्मदहन करताना सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले.