मनपा व्दारे नेहरू पार्क, मजीप्रा कार्यालय तसेच आर डी जी कॉलेज लगतच्या तसेच अतिक्रमणावर अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्यात आली.
अकोला दि. 5 जानेवारी 2024 – अकोला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये आज दि. 5 जानेवारी 2024 रोजी नेहरू पार्क चौकातील, मजीप्रा कार्यालय लगतचे तसेच आर डी जी कॉलेज जवळील वाहतुकीस अडचण निर्माण करणा-या अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभागाव्दारे अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवून रस्ता मोकळा करण्यात आला आहे.
या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहा.अतिक्रमण अधिकारी प्रविण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, अतिक्रमण विभागातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.