बापरे बाप ट्रकच्या केबिनमध्ये निघाला भलामोठा कोब्रा !
विषारी साप सर्पमित्रांनी दिले जीवनदान

अकोला ते मुर्तीजापुर या राष्ट्रीय महामार्गावर संध्याकाळी पाचच्या सुमारास एक ट्रक MH12QW9806मूर्तिजापूर कडून अकोला कडे येत होता,अचानक चालकाला चालक सिटच्या बाजूला साप असल्याचे दिसले तात्काळ चालकाने वाहन थांबवताच चालक ट्रक केबिन बाहेर येऊन बसला, भयभीत झालेल्या चालकानी तेथील उपस्थित गर्दी करत असलेल्या ग्रामस्थांची मदत घेऊन पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्र कुमार सदंशिव यांना सूचना दिली वेळेचा विलंबन करता घटनास्थळी सर्पमित्र कुमार सदांशिव,सर्पमित्र सुरज सदांशिव,सर्पमित्र प्रशांत नागे प्रणय सदांशिव घटनास्थळी पोहोचले शोधा केला असता अथक परिश्रमानंतर या सापाला शोधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले व या सापाला पाहण्याकरिता रस्त्यावर गर्दी जमली होती सापाची माहिती कोब्रा जातीचा अत्यंत विषारी साप विषाचे प्रकार न्यूरोटॉक्सिक लांबी पाच फूट व हा अत्यंत विषारी साप आहे अशी संपूर्ण माहिती सर्पमित्र कुमार सदांशिव यांनी येथील उपस्थित लोकांना दिली,चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टाळला तरी सर्पमित्र यांनी सर्व वाहन चालकांना वाहनात प्रवेश करण्या आधी पूर्ण वाहनाची संपूर्णपणे पाहणी करून घ्यावी अशी माहिती दिली कोठेही साप दिसल्यास ताबडतोब वन विभागाशी संपर्क साधावा किंवा सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधावा…