अकोला शहरातल्या रामदास पेठ पोलीस हद्दीत एका साडेचार वर्षाच्या मुलींचे अपहरण….!
अकोला शहरातल्या रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील जिल्हा न्यायालयासमोर रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी मध्ये राहणारे मालाकार कुटुंब हे कामानिमित्त अकोल्यात आले असून त्यांची साडेचार वर्षांची मुलगी गुड्डी ही बाजूला असलेल्या मारुती मंदिरा जवळ दोघी मुली खेळत असतांना यातील गुड्डी ला ही महिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घेवून गेली असल्याची तक्रार दिली रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये गुड्डी च्या वडिलांनी दिली असून….पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून रामदास पेठ पोलीस आणि LCB पोलीस त्या महिलेचा आणि गुड्डीचा शोध घेत आहे….!