अवघ्या 12 तासात रामदापेठ पोलिसांनी लावला अपहरणाचा छडा ; अपहरण करणारी महिला अटक
अवघ्या 12 तासात रामदापेठ पोलिसांनी लावला अपहरणाचा छडा ; अपहरण करणारी महिला अटक
रामदास पोलीस पेठ स्टेशन हद्दीतील जिल्हा न्यायालयासमोर रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी मध्ये राहणारे मालाकार कुटुंब कामानिमित्त अकोल्यात आले होते काल दुपारच्या सुमारास त्यांची साडेचार वर्षांची गुड्डी ही खेळत खेळत टिळक पार्क जवळील मारुती मंदिरा कडे गेली, त्याच वेळी एक लाल साडी घातलेली महिला त्या ठिकाणी आली व लहान मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवित तिला सोबत घेऊन गेली, घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आई वडिलांच्या संपूर्ण परिसरात शोध घेतला परंतु मुलगी कुठेही आढळून न आल्याने अखेर त्यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली, रामदास पेठ पोलिसांनी याबाबतीत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी तपास चक्र फिरवत यंत्रणा कामी लावली व बारा तासाच्या आत अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेतला, आज दुपारच्या सुमारास रामदास पेठ पोलिसांनी मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला माणिक टॉकीज परिसरातून ताब्यात घेतले महिलेच्या घरी शोध मोहीम राबविली, त्या ठिकाणी अपहरण झालेली मुलगी ही सुरक्षित रित्या आढळून आली, रामदास पेठ पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतली असून आज तिला न्यायालयात करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, महिलेने मुलीचे अपहरण का व कशासाठी केले याचा तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.