हर्षदा सोनोने यांचा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सन्मान!
अकोला : जिजाऊ ब्रिगेडतर्फे जिजाऊ सावित्री दशरात्रोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन आज ६ जानेवारी रोजी स्थानिक मराठा सेवा संघ कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून तानुबाई बिर्जे जयंती निमित्य अकोला जिल्ह्यातील महिला वृत्तवाहिनी प्रतिनिधी हर्षदा गणेश सोनोने यांना जिजाऊ ब्रिगेड अकोला जिल्हा च्या वतीने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा स्थानिक मराठा सेवा संघाचे सभागृहात पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
यावेळी डॉ सीमा तायडे, डॉ. कल्याणी महल्ले जिजाऊ ब्रिगेडच्या इंदुताई देशमुख, जिल्हाध्यक्ष रेणू गावंडे, शहराध्यक्ष प्रतिभा मते. जया जायले, उज्वला पुंडकर, वृंदा कोरपे, एडवोकेट रूपाली शिजोळे, साधना ठाकरे, प्रा, अनघा सोनखासकर, प्रा. शिला कोकाटे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा व शहर शाखा महिला आदींची प्रमुख उपस्थिती होती