लोकांच्या जिवावर उठलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करणा-या पोलिसांची कारवाई!

लोकांच्या जिवावर उठलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करणा-या पोलिसांची कारवाई!

आरोपीतांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखा, अकोला ची धडक कारवाई दोन आरोपी ताब्यात एकूण ३३,६००/- रु. चा मुददेमाल जप्त!

देशात मकर संक्रातीचा सण जवळ आला असुन त्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात पंतग उडविण्याची प्रथा आहे. राज्यात व देशात नायलॉन मांज्याने पंतग उडवील्यामुळे बरेच इसम गंभीर जखमी होवुन काही पक्षी प्राण्यांचा व इसमांचा मृत्यु झाला आहे. तसेच बरेच पक्षी व प्राणीसुध्दा जखमी झालेले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सदर नॉयलॉन मांज्याच्या वापरास प्रतीबंध केला आहे. तरी काही इसम नायलॉन मांजाची अनाधिकृत विकी करीत आहेत त्यामुळे मा. पोलीस अधिक्षक साहेब, अकोला यांनी जिल्हयाभरात नायलॉन मांजा विक्री करणा-या इसमांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले असता पो. नि. श्री. शंकर शेळके स्था.गु.शा, अकोला यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना चायनिज/नायलॉन मांजा विक्री करणा-या इसमांविरुध्द कारवाई करण्याची सुचना दिली असता पथकाने अकोला शहरात दोन ठिकाणी चायनिज मांजा विक्री करणारे इसम नामे (१) शहबाज खान इनायत खान वय २६ वर्ष रा. अतार गल्ली, तेली पुरा, अकोला व (२) शेख आबीद शेख रउफ वय २४ वर्ष रा. कादर अपार्टमेंट, कांगरपुरा, अकोला यांचेविरूध्द कारवाई करून त्यांवेपासुन प्रतिबंधीत नायलॉन मांजा एकुण २४ बंडल (रील) किंमत अं. ९,६००/- रू. व दोन मोबाईल किंमत अं.२४,०००/- असा एकुण ३३,६००/- चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही इसमांविरूध्द गुन्हा नोंद करून त्यांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामदास पेठ,

अकोला यांचे ताब्यात देण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अभय डोंगरे सा, पो.नि. शंकर शेळके, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. कैलास भगत, पो. उपनि. गोपाल जाधव, पोहेकॉ. सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, नापोकॉ. अविनाश पाचपोर, वसिमोदिदन शेख, विशाल मोरे, पोलीस अंमलदार, ऐजाज अहमद व भिमराव दिपके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news