काका, दादा, मामा फॅन्सी नंबर प्लेटवर लिहीलेले वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांची कारवाई!

काका, दादा, मामा फॅन्सी नंबर प्लेटवर लिहीलेले वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांची कारवाई!

विना हेल्मेट दुचाकी वाहन चालकांवर होणार कारवाई!

अकोला जिल्हयामध्ये नविन रूजु झालेल पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व पोलीस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत फॅन्सी नंबर प्लेट व वाहनाच्या संबंधीत सायलेन्सर अधिक आवाज करणारे चालकांच्या वाहनांवर कलम ५०/१७७, ५१/१७७ व कलम १९८ मोवाका प्रमाणे नियमांचे उल्लंघन करणारे वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता संपूर्ण अकोला जिल्हयात दिनांक ०३/०१/२०२४ ते ०६/०१/२०२४ दरम्यान विशेष मोहीम राबवीण्यात आली.
सदर मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे कडुन फॅन्सी नंबर प्लेट व विशीष्ट लिखान असलेले
काका, दादा, मामा इत्यादी लिहीलेले वाहनांवर एकुण १०३१ केसेस करून ५,१५,५०० रू दंड आकारण्यात आला. तसेच वाहनाच्या संबंधीत अधिक आवाज करणारे सायलेन्सर असलेले बुलेट वाहनांवर ५७ केसेस करून ५७००० रु दंड आकारण्यात आला.
मोहीमे दरम्यान जिल्हा नांदेड येथील पोलीस स्टेशन भाग्यनगर येथुन दिनांक ३०/१२/२०२३ रोजी चोरी गेलेली बुलेट कमांक MH 26 BM 2797 ही पो.स्टे. एम. आय.डी.सी येथे पकडण्यात आली व पो.स्टे.एम.आय.डी.सी. येथे कार्यवाही करण्याकरीता डिटेन करण्यात आली आहे. तसेच पुढील आठवडयात विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविणारे चालकांवर विशेष मोहीम घेवुन कार्यवाही करण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुवाकी वाहन चालवितांना आढळून आल्यास चालकाला ५००रू दंड आकारण्यात येईल व लायसन्स निलंबन करण्याची कारवाईला तोंड दयावे लागणार आहे. करीता नागरीकांनी दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा व सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगायें, याहतुक नियमांचे पालन करावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन मा. श्री. बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोल जिल्हयातील नागरीकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news