अकोला महापालिका प्रशासनाने चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर अध्यप एकही कारवाही केली नसल्याने महापालिका प्रशासन कोणाचा मृत्यू होण्याची वाट पाहत आहे का!
जेल गेट समोर चायना मांज्यांमुळे 2 जन जखमी,एकाच्या मानेला लागले 14 टाके!
चायना मांज्यामुळे प्रत्येक वर्षी जखमी झाल्याच्या घटना आपल्या समोर येत असतात, परंतु यावर कायमचा निर्बंध लावण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे. अशीच घटना अकोल्यातही घडली आहे.
मकर संक्रांती निमित्य लोक पतंग उडविण्याचा आनंद घेतात. असे असतानाच दुसरीकडे मात्र, पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायना मांजामुळे लोक जखमी होतात. अकोला शहरातील मुल्लानी चौक येथील रहिवाशी मोहम्मद अवेश आवेश आसिफ हे आपल्या टू व्हीलर नातेवाईक महिलेबरोबर उड्डाणपूला वरून जात असताना जेल गेट जवळ उड्डाणपूलावर चायना मांज्यामुळे चालक मोहम्मद आसिफ यांची मान कापल्या गेली, तर महिलेचा हाताला जखम झाली. ही घटना सायंकाळी 6 ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. जखमींवर शासकीय वैधकीय रुग्णालय येथे उपचार सुरू असून त्यांच्या मानेला 14 टाके लागले आहेत. तर सोबत असलेल्या महिलेच्या हाताला इजा झाली असल्याची माहिती जखमीचे नातलग शोहेब खान यांनी दिली आहे. चायना मांज्यामुळे राज्यातील इतर शहरात सतर्कता बाळगली जात आहे, चायना मांज्या विक्रीवर अंकुश लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र अकोला महापालिका प्रशासनाने चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर अध्यप एकही कारवाही केली नसल्याने महापालिका प्रशासन कोणाचा मृत्यू होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.