तुम्ही सर्व पत्रकार म्हणजे समाजसुधारकच! ठाणेदार योगेश वाघमारे
व्हाईस ऑफ मीडियाचा पत्रकार दिन सोहळा
अकोला : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी कधीही स्वतःला पत्रकार म्हटले नाही. त्यांनी स्वतःला पूर्णपणे सामाज सुधारणेसाठी झोकून दिले होते. असीम बुद्धीमत्तेचे ते धनी होते. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या आणि लेखनीचा उपयोग त्यांनी पूर्णपणे समाजसुधारक कार्यासाठीच केला. त्यामुळे ते खरे समाजसुधारक होते आणि म्हणूनच तुम्ही सर्व पत्रकार म्हणजे समाजसुधारकच आहात, असे प्रतिपादन दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी केले.
‘व्हॉइस ऑफ मीडिया’ अकोला जिल्ह्याचा पत्रकार दिन सोहळा शनिवारी (ता.६) दुपारी अकोट तालुक्यातील वेताळबाबा संस्थान येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना सहायक पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे बोलत होते. त्यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणे चर्चा केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय खांडेकर यांनी प्रास्तविकातून व्हाईस ऑफ मीडियाची व्याप्ती व कार्य विषद केले. संचालन प्रकाश गायकी यांनी केले. व्हॉइस ऑफ मीडियाचे अकोट तालुकाध्यक्ष मुकुंद कोरडे यांच्या टीमच्या पुढाकारात या उत्कृष्ट व नियोजनबद्ध कार्यक्रमाचे तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रमुख अतिथींसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रमुख अतिथींना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे उमेश अलोने, धनंजय साबळे, संजय वाट, विमल जैन, विजय केंदरकर, ॲड. समीर ठाकूर,संजय सोनार, मनोहर मानकर, आशिष वानखडे, मधू कसबे, दुले खान, विष्णू गावंडे, अनुप ताले, संतोष जुमळे, सिद्धार्थ वाहूरवाघ, अनंता शिंदे, पवन गवई,दीपक गवई, प्रमोद मोहरील, गणेश हिरुळकर, शंकर जोगी, बाळू पाखरे, सोनू सावजी, प्रकाश गायकी, नितीन तेलगोटे, रवी वानखडे, सागर भालतीलक, सारंग कराळे,अनिल
वगारे,स्वप्निल इंगळे, निलेश नवघरे, राहुल भेले,मंगेश निबोळकर, आणि अकोट, पातूर, बार्शीटाकळीची टीम प्रामुख्याने उपस्थित होती.