दुचाकीच्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी!
मूर्तिजापूर -. मुर्तीजापुर ते पिंजर रोडवरील पिंजर ते मोझरी खु.च्या मध्यभागी असलेल्या वळणावर सुरज जिवन चक्रनारायण अंदाजे वय 18 वर्ष रा.काजळेश्वर ता.कारंजा जि.वाशिम आणी गणेश समेर चव्हाण अंदाजे वय 18 वर्ष रा.पाराभवानी ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला हे दोघेजण दुचाकीने जात असतांना दुचाकीचे नियंत्रण सुटले आणी वळणावरील बाजुला जाऊन पडले यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले यावेळी येथुन जात असलेले पिंजर येथील ज्ञा.प्र.वी.काजळेश्वर येथील कर्मचारी गजाननभाऊ कळसकार यांनी पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती दिली आणी लगेच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार,कूणाल जवके, अमित ठाकुर यांना पथकाच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी रवाना केले तो पर्यंत जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन डाॅक्टरांना माहीत देऊन सज्ज ठेवले लगेच दोन्ही जखमींना येथे आणले असता वैद्यकीय अ.डाॅ.जिएम वानखडे मॅडम यांनी उपचार करुन तात्काळ चालक मयुर सळेदार,अमित ठाकुर कुणाल जवके हे पथकाच्या रुग्णवाहिकेने अकोला येथे घेऊन गेले.तात्काळ मदत मिळाल्याने नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात पथकाचे आभार मानले. विशेष म्हणजे घटनास्थळी दहा मिनटात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची रुग्णवाहिका व सेवक दाखल होऊन तात्काळ पिंजर येथील प्रा.आ.केंद्रात दाखल केले यावेळी वै.अ.एम.जी.वानखडे,डाॅ.रश्मी महल्ले,कर्मचारी अनु शिरसाट, पूनम सोनोने,सुनिल खंडारे,रमेश जवंजाळ,यांनी सहकार्य केले अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.