अकोल्यातील गावगुंडाविरुद्ध ठाकरेंची शिवसेना आक्रमक
अकोल्यात ठाकरेंच्या सेनेकडून मूक मोर्चा काढण्यात आला
महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या प्रकरणात हा मोर्चा काढण्यात आला आहे
अकोला शहरातील सर्व कोचिंग क्लासेसचा या मूक मोर्चामध्ये सहभाग होता
अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे . याविरोधात ठाकरे गटाचे बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे . ट्युशन एरिया असलेल्या न्यु तोष्णीवाल लेआऊट ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा हा मोर्चा निघाला .1 जानेवारीला ‘नीट अभ्यासक्रमा’साठी शिकायला आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील विशाल धोटे या विद्यार्थ्याची कृषीनगर भागात गुंडांनी चाकू भोसकून हत्या केली होती. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली मात्र,ट्युशन असलेल्या भागात विद्यार्थ्यांना गुंडांचा मोठा त्रास आहे आणि यालाच कुठेतरी आळा बसला पाहिजे त्यासाठी आज जवाहर नगर चौक येथून हा भव्य असा मूक मोर्च्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पर्यंत भव्य मुक मोर्चा शिवसेनेकडून काढण्यात आला आहे……