देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन अधिक तीव्र, आज मध्यरात्रीपासून चालक/मालक सोडणार स्टिअरिंग!

देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन अधिक तीव्र, आज मध्यरात्रीपासून चालक/मालक सोडणार स्टिअरिंग!

अकोला. देशाच्या विविध भागात दौरा करून आज 9 तारखेला मध्यरात्रीपासून हिट अँड रन प्रकरणी आंदोलन अधिक तीव्रआंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्रमध्ये घेण्यात आला असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे यामध्ये अकोला जिल्हयातील अकोला जिल्हा मोटार मालक/वाहक असोसिएशन अध्यक्ष जावेद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली आहे.

देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन सुरू आहे परंतु सरकार मात्र भूमिकेवरती ठाम आहे, केंद्र सरकारने देशभरातील 25 करोड ड्रायव्हर चालकांचे संघटनांसोबत चर्चा करावी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये.आजपासून आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येतं असुन शांततेच्या तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे.कोणत्याही प्रकारची हिंसा व कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन होणारं नाहीं शांततेच्या मार्गाने परंतु अधिक आक्रमक व तीव्र आंदोलन म्हणजे आज मध्यरात्री पासुन चालक ड्रायव्हिंग स्टिअरिंग सोडणार आहेत.तसेच चक्काजाम देखील करण्याची तयारी आपण केली आहे त्यासाठी जिल्हयातील चालक/मालकांनी सहभागी व्हा असे आवाहन अकोला जिल्हयातील सर्व चालक मालकांनी केले आहे, यावेळी अकोला जिल्हा मोटार मालक/वाहक असोसिएशन ,अध्यक्ष जावेद खान पठाण , शहर अध्यक्ष गुड्डू सेठ, अकोला ड्रायव्हर असोसिएशन अध्यक्ष सैयद वसीम सह आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news