अकोला मनपा पुर्व क्षेत्रातील कॅफेवर मनपा आणि पोलीस प्रशासनाव्दारे सीलची कारवाई.
अकोला दि. 9 जानेवारी 2024 – अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत शास्त्री नगर येथील ईट एण्ड मीट कॅफे मध्ये मुला, मुलींना असभ्य वर्तन करतांना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाव्दारा सदर कॅफेचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. परंतू सदर धारकांनी व्यवसाय परवाना घेतला नसून मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता वंजारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाच्या उपस्थितीमध्ये मनपा बाजार/परवाना विभागाव्दारे सदर कॅफे वर काल दि. 8 जानेवारी 2024 रोजी सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी बाजार/परवाना विभाग प्रमुख राजेश सोनाग्रे, सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुभाष वाघ, भुषण मोरे, बाजार/परवाना विभागाचे सुरेंद्र जाधव, गौरव श्रीवास, सनी शिरसाट, उदय ठाकुर, सुधाकर सदांशिव, निखील लोटे, दिपक शिरसाट, पंकज पोफळी तसेच सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचा-यांची उपस्थिती होती.
मनपा उत्तर झोन कार्यालय अंतर्गत प्रतिबंधीत नायलॉन मांजा बाबत 5 हजार रूपयांची दंडात्मक कारवारई.
अकोला दि. 9 जानेवारी 2024 – अकोला मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री, वापर व हाताळणी बाबत उत्तर झोन स्वच्छता निरीक्षकांव्दारे राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहीम अंतर्गत स्वच्छता निरीक्षकांव्दारे तेलीपुरा चौक, मालीपुरा चौक, लक्कडगंज येथील पतंग मांजा विक्री करणा-या दुकानांची तपासणी दरम्यान पतंगच्या दुकाना जवळ असलेल्या एक संशयीत टु व्हीलर गाडीच्या डिक्कीची तपासणी केली असता त्याच्याकडे प्रतिबंधीत नायलॉन मांजाच्या रील सापडून आल्यावर त्याच्या कडे असलेला मांजा जप्त करून 5 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आणि नायलॉन मांजा नष्ट करण्यात आला आहे.
या कारवाईत उत्तर झोन क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, स्वच्छता निरीक्षक मोहम्मद अब्दुल सलीम, मोहम्मद अलीम खान, जोगेंद्र खरारे व जितेंद्रनाथ गोराणे आदींची उपस्थिती होती.