माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विवीध अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मेळावा अमरावतीला!
अकोल्यात माजी सैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
अकोला. माजी सैनिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरीता सब एरिया जी ओ सी नागपुर , स्टेशन कमांडर पूलगाव, अभिलेख ऑफिसर , ई सी एच एसचे ऑफिसर यांच्या उपस्थितीत माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अमरावती येथील जोग स्टेडियम येथे येणार आहेत. माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यात येणार आहेत. यासाठी अकोला जिल्हयातील माजी सैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ई सी एच एस पॉलीक्लिनिक अकोलाचे प्रभारी अधिकारी कर्नल रामानुज शर्मा (सेवानिवृत्त) व नर्सिंग असिस्टंट हरिभाऊ पंडे यांनी केले आहे.
अभिलेख कार्यालयाचे जीओ सी उपक्षेत्र नागपुर, पुनर्स्थापना विभागाचे तसेच स्टेशन कमांडर पुलगाव , ई सी एच एस,मिल्ट्री कॅन्टीनव्यवस्थाचे ऑफिसर यांचे वतीने जोग स्टेडियम ग्राउंड पोलीस मुख्यालया जवळ अमरावती येथे दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०,ते ३. ३० पर्यंत माजीसैनिकांना पुनर्स्थापना , पेंशन आदींबाबत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना विवीध ठिकाणीं पुनर्स्थापना करण्यासाठीं सब एरिया जी ओ सी नागपुर , स्टेशन कमांडर पुलगाव अभिलेख ऑफिसर , ई सी एच एसचे अधिकारी येणार आहेत. माजी सैनिकांना काही समस्या असतील तर त्या मेळाव्यामध्ये दूर केल्या जातील. त्यासाठी अकोला जिल्हयातील माजी सैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे.या मेळाव्याला येणाऱ्या माजी सैनिकांची अमरावती रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड येथुन येण्या – जाण्याची व भोजनाची तसेच दवाखान्याच्या सवलती तसेच मिल्ट्री कॅन्टीनव्यवस्था करण्यात आलेली आहे. अशीही माहिती कर्नल रामानुज शर्मा (सेवानिवृत्त) व नर्सिंग असिस्टंट हरिभाऊ पंडे यांनी दिली आहे. यावेळी सुभेदार प्रल्हाद जाधव, हवालदार गोपाल अरसोडड, सुभेदार मेजर अशोक ठाकरे, रेडियोग्राफर सुमेध पवार. उपस्थित होते.