चिंचोली रुद्रायणी शेतशिवारात झाले बिबट्याचे दर्शन! प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांची माहिती
अकोला जिल्हयातील बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी परिसरातील रोडवरील राजंदा येथील शेतशिवारात बंडू काळजाते यांच्या शेतामध्ये आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याची चर्चा गावकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. याबत गावकऱ्यांनी सत्य लढा न्यूज चॅनलशी दूरध्वनीवर संपर्क साधला आहे. आणि शेतात बिबट असल्याचे व्हिडिओ सत्य लढाला पाठवले आहेत. मात्र याबाबत वनविभागाला अध्याप माहिती नाही. याबाबत वन्य प्राणी मित्र देवेंद्र तेलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर बिबट्याचा रिपोर्ट हा बार्शीटाकळी वन विभाग कडे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत वन विभागाकडे अजून तरी कोणतीही माहिती नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळें चिंचोली रुद्रायणी शेतशिवारात बिबट्याचे दर्शन झाले की गावकऱ्यांना अन्य कुठला वन्य प्राणी दिसला याबाबत शशांक आहे.