चोर सोडून संन्यासाला फाशी अकोला महानगरपालिकेचा उत्तर झोन अधिकारी प्रताप !
चायना मांजाच्या कार्यवाही चा दिखावा…?
मनपा अधिकाऱ्यांना नागरिकांच्या जिवाचे नाही काही घेणे देणे नाही!

अकोला दि. 9 जानेवारी 2024 – अकोला मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री, वापर व हाताळणी बाबत उत्तर झोन स्वच्छता निरीक्षकांव्दारे राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहीम अंतर्गत स्वच्छता निरीक्षकांव्दारे तेलीपुरा चौक, मालीपुरा चौक, लक्कडगंज येथील पतंग मांजा विक्री करणा-या दुकानांची तपासणी करुन चायनीज नायलोन मांजा जप्तीची कार्यवाही करण्याचा देखावा करणाऱ्या उत्तर झोन सहा.आयुक्त देवकते यांनी आम नागरिकांच्या जिवाशी काही घेणे देणे नसल्याचे दिसुन आले.या दरम्यान पतंगच्या दुकाना जवळ असलेल्या एक संशयीत टु व्हीलर गाडीच्या डिक्कीची तपासणी केली असता त्याच्याकडे प्रतिबंधीत नायलॉन मांजाच्या रील सापडून आल्यावर त्याच्या कडे असलेला मांजा जप्त करून 5 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.आणि नायलॉन मांजा नष्ट करण्यात आला .म्हणजेच चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे दिसून येत आहे. मगरीला सोडून छोट्या माशाला पकडल्यासारखे होत असल्याचे चित्र सध्या चायना मांजाच्या माध्यमातून दिसून येत आहे.
या आधी प्लास्टिक तसेच हाॅटेलमध्ये स्वच्छता पाळत नसल्यामुळे . तसेच रस्त्यावर उघड्यावर नाष्टाची विक्री करणाऱ्यांवर तत्कालीन आयुक्त रोकडे,कल्याणकर आणी दयानंद चिंचोलीकर यांनी लाखो रुपयांचा दंड वसुल केला असुन सिलच्या कार्यवाही केल्याने हाटेल मालकांच्या तंबूत घबराहट निर्माण केली होती. तसेच मनपाला लाखो रुपयाचे उत्पन्न सुद्धा मिळाले होते. परंतु आता . क्षेत्रीय अधिकारी.आरोग्य निरीक्षक,सनेटरी इन्स्पेक्टर हप्ते वसुलित दंग असल्यामुळे कार्यवाहिचा देखावा करीत आहेत. तसेच मनपाचे उत्पन्न बुडवत आहेत.
यामुळे खरच चायना मांजा किंवा हाटेल स्वच्छता बाबत तंतोतंत पालन होत आहे का? याबाबत आयुक्तांनी माहिती घेतल्यास खुप मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. परंतु आता असे होतांना दिसत नाही अधिकारी आपली स्वतःची तिजोरी भरण्यात मशगुल असल्याचे चित्र दिसत आहे. आजच्या चायना मांजाच्या झालेल्या कारवाईत उत्तर क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, स्वच्छता निरीक्षक मोहम्मद अब्दुल सलीम, मोहम्मद अलीम खान, जोगेंद्र खरारे व जितेंद्रनाथ गोराणे आदींची उपस्थिती होती.