मूर्तिजापूर तालुक्यात जिल्हातील शिवसेना शिंदे गटाची पहिल्या शाखेचे उदघाटन…!

मूर्तिजापूर तालुक्यात जिल्हातील शिवसेना शिंदे गटाची पहिल्या शाखेचे उदघाटन…!

मूर्तिजापूर:- पक्ष संघटित करण्याकरिता प्रत्येक कार्यकर्ते ने एकोप्याने व जोमाने कार्य करणे गरजेचे असून, प्रत्येक गावात व सर्कल मध्ये जास्तीत जास्त शिवदूतांची नेमणूक करून तेथील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करा, व घरोघरी आपला भगवा फडकून आगामी निवडणुकांमध्ये आपले कार्यकर्ते निवडून शिवसेना शिंदे गटाचा भगवा शिखरावर रोवावा असे शिवसेना शिंदे गटाचे अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले मूर्तिजापूर येथील हातगाव शाखेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव सर्कल मधील शिवसेना शिंदे गटाची शाखेचे उदघाट्न मोठ्या थाटात संपन्न झाला. विशेष म्हणजे जिल्हातील ही सर्व प्रथम शाखा असल्याचे समजल्या जाते.
या वेळी तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे व महिला आघाडी तालुका प्रमुख ज्योतीताई सुतारे यांच्या मार्गदर्शनात प्रहार संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष अमोल वानखडे यांच्या सह शेकडो का कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यात आल्याने प्रहार संघटनेला आगामी निवडणुकीत मोठा धक्का सहन करावा लागणार असून शिवसेना शिंदे गटाची मूर्तिजापूर परीक्षेत्रात ताकद बळकट झाल्याचे बोलल्या जात आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष मजबुती करीता शिवसेना शिंदे गटाने कसली असून जिल्हातील पहिल्या शाखेचे उदघाट्न मूर्तिजापूर तालुक्यात हातगाव येथे जिल्हा प्रमुख अश्विन नवले, नानकसेठ नेभनानी,महिला आघाडी जिल्हा प्रमुख उषाताई विरक, शशिकांत चोपडे, शहर प्रमुख गायकवाड, जगजीतसिंग विरक, यांच्या प्रमुख उपस्थित शाखा फलकाचे अनावरान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तद-नंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे तालुका प्रमुख दिपक दांदळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रतिक कुऱ्हेकर यांनी कळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news