आज पासून सरकारी स्वस्त धान्य वितरण सेवा सुरू ; जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेनेची माहिती
राज्याच्या पुरवठा विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर अकोला जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेने पुकारलेला संप दिनांक 10 जानेवारी 2024 पासून मागे घेण्यात आला असून आज दिनांक 10 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व सरकारी स्वस्त धान्य दुकाने सुरू करण्यात आली आहेत त्याबाबत
जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेनेचे महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी हॉटेल सेंटर प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.