जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते एपिआय पंकज कांबळे सन्मानीत
बाळापुर:- २०२३ मध्ये उत्कृष्ट तपास, गुन्हे उकल, मुद्देमाल हस्तगत, क्लिष्ट तपास करणारे, डॉरमन फाइलमधील आरोपी अटक, एमपीडीए कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी करणारे एकूण ७२ पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बाळापूर पोलीस स्टेशनचे एपीआय पंकज कांबळे यांचा या सत्कारामध्ये विशेष समावेश होता.जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी एपीआय पंकज कांबळे, पोलीस कर्मचारी अक्षय देशमुख यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी अकोला जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुल राज जी, ठाणेदार अनिल जूमळे याच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कुख्यात गुंडाला कांबळे यांनी
एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी जिल्हा कारागृह स्थानबद्ध केले होते.
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर