अकोला पोलिसांच्या वतीने रुट मार्च!
संवेदनशील परिसर, शिकवणी वर्ग, शाळा, महाविद्यालय परिसरातून पार पडला रुट मार्च!
अकोला- जिल्ह्यात नूतन पोलिस अधीक्षकांनी पदभार स्वीकारताच पोलिस प्रशासन सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन विविध प्रकारची गस्त वाढली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः शहरामधील रस्त्यावर ज्ञपायी मार्गक्रमण करून शहरातील गुंडगिरी संपविण्याचे संकेत दिला आहे. यानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहनांच्या माध्यमातून ग्रस्त वाढविण्यात आली आहे. शहरातील प्रमुख चौकांतून मार्गक्रमण करण्यात आले. तसेच हा मार्गक्रमण संवेदनशील परिसर, शिकवणी वर्ग, शाळा, महाविद्यालय परिसरातून पार पडला. यावेळी सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी यांची वाहनेही सायरन वाजवत जवळून जात होती. काही दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. यानंतर शहरात गुंडगिरी वाढल्याची चर्चा नागरिकांतून होत होती, मात्र नूतन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते कायदा व सुव्यवस्थेबाबत सज्ज असल्याचे दिसून येत असून ते सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत आहेत. अकोला जिल्हा आहेत. आता शहरातील वाढता गुन्हेगारीचा आलेख कमी होणार असल्याचा चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. तसेच गुंडांमध्ये पोलिसांचा धाक कायम राहावा, त्यामुळे आज अकोला पोलिसांच्या वतीने रुट मार्च काढण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एससीडीपीओ सुभाष दुधगावकर व सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी हा मार्गक्रमण काढला.शहरातील प्रमुख मार्गावरून जाणारे पोलीस सायरन पाहून काही काळ लोक आश्चर्यचकित झाले, मात्र नंतर पोलीस ठाण्याने मार्गक्रमण केल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.