अकोला एमआईडीसी परिसरातील शिवर येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहन वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. महिला ही एमआयडीसी मध्ये मजुरीचे काम करीत असून संध्याकाळी सहा साडेसहा वाजता च्या सुमारास घरी परतत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. महिलेची ओळख पटली असून गोदावरी मनोहर गोपनारायण वय 53 राहणार शिवर असे नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर शिवर परिसरामध्ये अज्ञात कार ने महिलेला धडक दिली असून कार चालक घटनास्थळावरून प्रसार झाला. एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचत मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.