पातूर शहर लगत शिलाऀ ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा संपन्न.
पातुर तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकासाचा ध्यास करून आमदार नितीन देशमुख यांनी 9 कोटींचा निधी मंजूर केला व
विविध ठिकाणचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – पातूर तालुक्यात व शहरातील मंदिरांचे प्रांगण असो पातूर शहरातील पुरातन दर्ग्यातील विकास काम असो अशा अनेक ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांनी गेल्या काही महिन्यात जवळजवळ 70,80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला व विकास कामांची धुरा पार करण्याचे काम हाती घेतले नेमकेच पार पडलेल्या विविध ठिकाणच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये गाडगेवाडी येथे 2.50 कोटी रुपये निधी मधून बगीच्या व परिसर सुंदरीकरणाकरिता भूमिपूजन पार पडले तर स्वामी समर्थ केंद्राकरिता पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला तसेच आरिफ नगर येथील सभा मंडपाकरिता दोन कोटी पन्नास लक्ष रुपये तर साई मंदिर परिसरातील सभागृहाकरिता दोन कोटी पन्नास लक्ष व रामनगर परिसरातील सभागृहाकरिता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला तर शिलाऀ भागातील विविध नगरातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार नितीन देशमुख, यांचे भूमीस पूजन सोहळ्याप्रसंगी स्वागत करण्यात आले तर यावेळी तालुकाप्रमुख रवींद्र मुर्तंडकर पातूर शहर प्रमुख निरंजन बंड , युवा सेना उप जिल्हाप्रमुख सागर रामेकर, उप तालुका प्रमुख अनिल निमकंडे, विधानसभा सहसंघटक अंबादास देवकर,शहर संघटक आनंद तायडे, माजी न.प उपाध्यक्ष परसराम उंबरकार, डॉ डिगांबर खुरसडे ,सुनील गाडगे, कैलास बगाडे, सागर कढोणे, अजय पाटील, शंकर देशमुख, सचिन गिरे, दिपक देवकर, दिलीप फुलारी, रवी काकड ,गणेश पाटील, संतोष गवई , प.स सदस्य गोपाल ढोरे , सुरज झडपे, गजानन शिंदे, पवार साहेब, संतोष पाटील, राजेश भगत अनेक शिवसैनिक व नागरिकांची उपस्थिती होती.