पोलिसांवर फायरिंग ची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपये बक्षीस जाहीर!

पोलिसांवर फायरिंग ची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपये बक्षीस जाहीर!

पोलीस अधिक्षक यांची पो.स्टे. उरळ हद्दीत फायरींग चे घटनास्थळी भेट!.

दि. ३१/१२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीत मांजरी फाटा ते कंचनपुर रोडवर गस्त दरम्यान मोटर सायकल वरील संशयीत इसमांचा पोलीसांनी पाठलाग केला असता सदर संशयीत यांनी पोलीसांच्या वाहनावर शस्त्र काढून फायर केला. त्या घटनेवरून पोलीस स्टेशन उरळ येथे अप क. ४३२/२०२३ कलम ३५३, ३३६, ३४ भा.दं. वि. सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट . चा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा आज पर्यंत उघडकिस न आल्याने पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह . तसेच अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अभय डोंगरे . तसेच बाळापुर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ASP श्री गोकुळ राज . व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरिक्षक श्री शंकर शेळके सोबत पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकातील अंमलदार व उरळ येथील ठाणेदार . पोलीस निरिक्षक गोपाल ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. व पोलीस अधिक्षक . यांनी संबधित अधिकारी यांना गुन्हा उघड किस आणण्याच्या दृष्टीने व तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

पोलीस प्रशासनाकडुन जाहिर करण्यात आले आहे, जो कोणी सदर घटनेसंबधी माहिती देईल त्याला २५०००/-रूपयांचे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. किंवा प्रत्यक्ष येवुन स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, पो.स्टे. उरळ येथील ठाणेदार यांच्या जवळ माहिती देवु शकतात. अथवा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके मो.न. ९९२१०३८१११ व पोलीस स्टेशन. उरळ ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले ९६०४३६४४०६ यांच्याशी संपर्क साधावा, संपर्क करणा-याचे नाव व मो. क. हे गुप्त ठेवण्यात येईल. असे आव्हान यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news