पोलिसांवर गोळीबार करणारे 5 आरोपी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात..!
माजरी ते कंचनपूर या रस्त्यावर दिनांक 30 डिसेंबर रोजी उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या अकोला तालुक्यातील कांचनपूर माजरी पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान कंचनपुर ते मांजरी रोडवर पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केली आहे. यामध्ये आरोपी 20 ते 32 वयोगटातील असून आरोपीकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपी हे हरीण व रानडुकरांच्या पकडण्याच्या उद्देशाने हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्याने या पाच आरोपींतानी पोलिसांच्या गाडीवर शासकीय वाहनावर फायरिंग केली होती त्यामुळे प्राण घातक हल्ला केला केल्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखीन यामध्ये आरोपी आहेत का याबाबत कसून चौकशी पोलीस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखा पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापुर गोकुळराज उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी केली आहे आरोपी त्यांना पुढील चौकशीसाठी उरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.