शिवसेना शिंदे गटातर्फे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकवल्याबद्दल सत्कार!
गोल्ड मेडल पटकावल्या बाबत शिवसेना शिंदे गटाने नेहरू पार्क येथील संपर्क कार्यालयात केला भक्ती चुंगडे चा सत्कार!
कु, भक्ती रवींद्र सिंह चुंगडे या मुलीने दिल्ली येथे झालेल्या 67 व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे त्या अनुषंगाने आज दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते श्रीरंग दादा पिंजरकर यांच्या नेहरू पार्क चौक येथे असलेल्या संपर्क कार्यालयात भक्तीचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यात महिला बॉक्सरांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्रशिक्षकांचे श्रीरंग पिंजरकर यांनी आभार व्यक्त केले यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना माजी नगरसेवक तथा माजी उपजिल्हाप्रमुख बादल सिंग ठाकूर गजानन पावसाळे ,संतोष अनासाने ,रामदास हरणे, तुकाराम दुधे , शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख उमेश आप्पा भुसारी, अनंता राजनकर, एडवोकेट पप्पू मोरवाल, रमेश तुकेकर,आदी उपस्थिती होते
यावेळी उपस्थितितांचे आभार मुलीचे वडील रवींद्र सिंग चूंगडे यांनी मानले कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक संतोश अनासाने यांनी केले.