हिवरखेड येथे श्रीमद् भागवत कथा व श्रीराम दरबार मूर्ती स्थापना प्राणप्रतिष्ठा चे आयोजन
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील राजस्थानी समाज मंडळ तर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन तसेच श्रीराम दरबार मूर्ती स्थापना प्राणप्रतिष्ठा चे आयोजन करण्यात आले आहे.
मधुबन मथुरा येथील पंडित श्री.
त्रीलोकीनाथजी शास्त्री यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवत
कथेचे वाचन येथील माहेश्वरी भवन येथे होणार आहे. दिनांक 15 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 पर्यंत दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत सदरहू श्रीमद् भागवत कथेचे भक्तगण श्रवण करू शकतील. तसेच दिनांक 21 जानेवारी 2024 रविवारी दुपारी एक वाजता श्री राम दरबार ची नगर प्रदक्षिणा होणार असून दिनांक 22 जानेवारी 2024 सोमवार रोजी पूर्णाहूती व प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी महाप्रसादी ने श्रीमद् भागवत कथेचे समापन होणार आहे.दिनांक 15 जानेवारी रोजी कलश यात्रा व श्रीमद् भागवत पूजन तसेच प्रारंभ होणार आहे. दिनांक 16 जानेवारी रोजी परीक्षित जन्म व वराह अवतार , दिनांक 17 जानेवारी रोजी ध्रुव चरित्र, प्रल्हाद चरित्र, दिनांक 18 जानेवारी रोजी वामन अवतार, श्री राम जन्म, श्रीकृष्ण जन्म, दिनांक 19 जानेवारी रोजी श्रीकृष्ण बाललीला ,गोवर्धन पूजा व 56 भोग, दिनांक 20 जानेवारी रोजी महाराज व रुक्मिणी विवाह , दिनांक 21 जानेवारी रोजी सुदामा चरित्र, परीक्षेत मोक्ष, हवान पूजा, दिनांक 22 जानेवारी सोमवारी महाप्रसादी अशा प्रकारे श्रीमद् भागवत कथेची रूपरेषा असून शेकडोच्या संकेत भाविक भक्तांनी श्रीमद् भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.